Department Of Marathi

 मराठी विभाग  आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या  मराठी विभागाची स्थापना १९४८ मध्ये झाली.अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  सुप्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक  श्री.के.क्षीरसागर मराठी विभागाचे पहिले विभाग प्रमुख होते.मराठी साहित्य समीक्षा क्षेत्रातील दिग्गज मराठी विभागप्रमुखांची परंपरा या विभागाला लाभलेली आहे.*मराठी विभागामध्ये  कवयित्री प्रा.डॉ. वर्षा स. तोडमल या मराठी विभागप्रमुख आहेत.प्रा. मनोज तेलोरे आणि प्रा. विशाखा हेंद्रे हे दोघे तासिका तत्त्वावरती कार्यरत आहेत.  तर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये  प्रा. डॉ. जयश्री दाते आणि डॉ.पांडुरंग कंद  हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.* महाविद्यालयाचा मराठी विभाग ७३ वर्षे जुना आहे.* प्रथम वर्ष ते तृतीय वर्षापर्यंत मराठीच्या एकूण १० अभ्यासपत्रिकांचे अध्यापन केले जाते.* मराठी विभागाने आतापर्यंत विविध विषयांवरील कार्यशाळा,चर्चासत्र,कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.* विभागातील शिक्षक आणि विद्यार्थी यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण.* विभागात विद्यार्थी संख्या समाधानकारक आहे.* विभागातील अनेक माजी विद्यार्थी पत्रकारिता,नाटक,चित्रपट,शिक्षण,साहित्य क्षेत्रात झळकत आहेत.About the Subject* मराठी साहित्य या विषयामुळे विद्यार्थ्यांमध्ये 'साहित्यिक ज्ञानक्षमता' निर्माण होते.* विद्यार्थ्यांची वैचारिक, सामाजिक जाणीव प्रगल्भ होते.* महाराष्ट्र लोकसेवा आयोग (M.P.U.S.C) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (U.P.S.C) या स्पर्धा परिक्षांमध्ये मराठी विषयाची १०० गुणांच्या अभ्यासपत्रिकेची पूर्ण तयारी मराठी साहित्य या विषयामुळे होते.* मराठी साहित्य या विषयामुळे भाषांतर,मुद्रितशोधन,पत्रकारिता ( प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक मिडिया) ,सूत्रसंचालन,जाहिरातलेखन ,पटकथा,संवादलेखन, वृत्तनिवेदन,जनसंपर्क इत्यादी क्षेत्रात कार्य करण्याची संधी.*नाटक,चित्रपट,लोककला,लोकसाहित्य,भाषाशास्त्र,बोली भाषा , साहित्य इ. क्षेत्रात संशोधन आणि कार्य करण्याची संधी.भाषेतील प्रकाशाचा अनुभव उपनिषद्कारांनी  वर्णन केला आहे तसाच संत ज्ञानेश्वरांनीही तो अनुभव वेगळ्या प्रकारे वर्णन केला आहे.ते लिहितात :"जैसे बिंब तरी बचकेंएवढें|  परी प्रकाशा त्रेलोक्य थोकडें ||शब्दांची व्याप्ती तेणें पाडे|  अनुभवावी||"(ज्ञानेश्वरी: अध्याय ४,ओवी २१५)या ओळीतील  दृष्टांतातून ज्ञानेश्वरांनी भाषेतील  प्रकाशतत्वाचे  सूचन  केले आहे. तेव्हा सध्याच्या स्थित्यंतरातून जाताना  भाषेच्या अंगचा अमीट प्रकाश आपल्याला दिशा देईल असा दृढ विश्वास बाळगूया.माऊली असेही म्हणतात,माझ्या मराठी भाषेचे मोठेपण मी काय सांगू?माझा मराठाचि बोलु कौतुके।परि अमृतातेही पैजा  जिंके।ऐसी अक्षरे रसिके।मेळवीन।। ज्ञाने. ६/१४अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरे, अशी अमृत भाषा मराठी.भाषा ही व्यक्तीसाठी भावजीवनाची अस्तर आहे आणि समाजासाठी संस्कृतीची वाहक आहे. अशी ही मराठी भाषा मुळात सर्वस्पर्शी आहे.मराठी ही महाराष्ट्राची लोकभाषा, मातृभाषा व एकमेकांशी संवाद करण्याची भाषा म्हणून निदान सातशे वर्षे सातत्याने वापरात आहे. आपण ज्या भाषेत जन्मतो, वाढतो ती भाषा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असते.मराठी भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.उत्तमोत्तम मौलिक आणि प्राचीन ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथ विभागात आहेत.Student Capacity
ClassIntake
F.Y. B. A.360
S.Y.B.A.(Special)30
S.Y.B.A.(General)120
T.Y.B.A.(Special)30
T.Y.B.A.(General)120
M.A.(II)22
Infrastructure facilities in the Department of Marathi are as follows: Following equipments are avaliable 1) Computer 2) Printer 3) Internet facility is also available.
PhotoNameQualificationExperianceCV
Dr. Varsha Todmal, HeadM.A ,B.Ed, D.CJ, Ph.D..20 yearsView
Staff Details
साहित्य साधना मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अहवाल(१ जानेवारी २०२० ते १५  जानेवारी २०२० )भाषेचे वैभव जपण्यासाठी, मराठी भाषेचा सार्वत्रिक वापर होण्यासाठी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर प्रतिवर्षी  दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा केला जातो. याच उपक्रमाचे औचित्य साधून आबासाहेब गरवारे कला महाविद्यालयातील मराठी विभागाकडून  विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले. यानिमित्ताने व्याख्यान,निबंधलेखन,काव्यवाचन,गीतगायन,कथालेखनपुर्ती,चित्रपट व त्यावर चर्चा, पंचवेध, काय व कसे वाचावे, एकांकिका सादरीकरण, संमेलनाला भेट, संशोधन मंडळास भेट इ.विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन केले गेले. प्रत्येक उपक्रमाचा अहवाल तारखेनुसार खालीलप्रमाणे देत आहे.
  • दिनांक २ जानेवारी २०२०- निबंध स्पर्धा- स्पर्धेसाठी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, मी काय वाचतो काय वाचले पाहिजे, मलाही काही गवसले आहे, होय मला जाणीव आहे त्या परंपरांची हे विषय निवडले होते.
  • दिनांक- ३ जानेवारी २०२० रोजी वक्तृत्व स्पर्धा- स्पर्धेसाठी  सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणविषयक विचार, जिजाऊ-सावित्रीच्या लेकींचा तेजोमय प्रवास, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ, शिक्षणात समाज माध्यमांचा उपयोग, निर्भया ते हैद्राबाद अजून किती दिवस हे विषय निवडले होते.
  • दिनांक ४ जानेवारी २०२०- नुक्कड साहित्य विवेक मंच आयोजित कथा साहित्य संमेलनास भेट.
  • दिनांक ६ जानेवारी २०२०- माणूस व निसर्ग यांच्यातील नातेसंबंध उलगडून दाखवणारा , मराठी कविता व मराठी गीतांच्या माध्यमातून सादर होणा-या ‘ पंचवेध’ कार्यक्रमाचे आयोजन, प्रमुख कलाकार म्हणून आश्लेषा महाजन, डॉ. राजश्री महाजन आणि स्वाती दाढे उपस्थित.
  • दिनांक ७ जानेवारी २०२० - गीतगायन स्पर्धा व पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा.
  • दिनांक ०८ जानेवारी २०२०-‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा मराठी चित्रपट पाहणे व त्यावर  चर्चा.
  • दिनांक ९ जानेवारी २०२०- स्वरचित कविता व मान्यवर कवींच्या कवितांची काव्य वाचन.
  • दिनांक १० जानेवारी २०२०-‘काय व कसे वाचावे’ या विषयावर व्याख्यान-वक्ते- डॉ. वंदना बोकील.
  • दिनांक ११ जानेवारी २०२०- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भेटीचे आयोजन- एकूण ४० विद्यार्थी सहभागी.
  • दिनांक १३ जानेवारी २०२०- एकांकिका ‘विठ्ठल तो आला आला’ ‘हंडाभर चांदण्या’ या एकांकिकांचे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरण.
  • दिनांक १५ जानेवारी विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी डॉ. मृदुला बेळे व प्राचार्य, पी. बी. बुचडे यांचे हस्ते बक्षीस वितरण समारंभ.
पुणे पुस्तक वाचन उपक्रम २०२४ 
 
भाषा पंधरवडा २०२४-२५ 
विश्व साहित्य संमेलन २०२४-२५
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि  म.ए.सो चे आबासाहेब गरवारे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  समीक्षा संमेलन....
२१ ऑगस्ट २०२४
मराठी विभागातील चर्चासत्र, कार्यशाळा, आणि विविध उपक्रमांना नामवंत  साहित्यिकांची भेट.... एक झलक
Scroll to Top
Skip to content